सदाभाऊ खोत यांच्या भाषणावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

टीम महाराष्ट्र देशा :  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आयोजित केलेल्या पंतप्रधान पीक विमा योजना आढावा बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला.

पुणे विद्यापीठ रस्त्यावरील वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थेत बुधवारी ( १० जुलै ) प्रधानमंत्री पीक विमा योजनेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थितांना संबोधत होते. त्यावेळी पीक विमा कंपन्यांच्या नफेखोरीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नुकसानीचा परतावा मिळत नाही. विमा कंपन्यांच्या फायद्यासाठीच सरकार धोरण राबवित आहे. यात भ्रष्टाचार झाला अशा घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आयोजित बिअथ्कित जात दिल्या.

दरम्यान बैठकीत काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यावेळी पोलीसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना सभागृहाबाहेर काढले.