भारतीय दलित पँथरची जिल्हा कार्यकारणी जाहीर

औरंगाबाद : भारतीय दलित पँथर औरंगाबादची जिल्हा बैठक अशोक श्रीखंडे यांच्या अध्यक्षतेखाली दि. १२ सप्टेंबर रोजी पार पडली. या बैठकीस पॅंथरनेते ॲड. रमेश खंडागळे यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करून शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी एकजुटीने एका ध्येयाने व एका विचाराने कार्यकर्त्यांना, संघटीत होऊन संघर्ष करण्याचे आवाहन केले.

या बैठकीस एस. एस. जमधडे, संभाजी साबळे, हिरामन मगरे, ज्ञानेश्वर खंडारे, गणेश चव्हाण,सिद्धार्थ ठोकळ, संजय पंडीत, बी के ‘जाधव, बंटी ढेपे, सुभाष पठारे, गौतम पठारे, सुमीत श्रीरवंडे, अमोल शेजूळ, राहुल कीर्तिशाही, कैलाश कंकाळ,रमेश पवार,धोंडीराम पंडीत, चंद्रभान नरोडे,सुनील निंभोरे, भय्यासाहेब चव्हाण, गोरख हिवाळे,रवि निकम, बाबासाहेब खंडागळे, रोहीत भालेराव, गौतम नरवडे, सागर संभादीडे,रामदास नरवडे, अकाश खिल्लारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते,

या कार्यकारिणीची घोषणा ॲड. रमेशभाई खंडागळे यांनी केली. यामध्ये प्रामुख्याने अध्यक्ष म्हणून अशोक श्रीखंडे, उपाध्यक्षपदी गौतम इंगळे, सरचिटणीस म्हणून सुरेश खांडवे, संघटकपदी झानेश्वर खंदारे तर सचिव म्हणून बी. के. जाधव यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रास्ताविक सिदार्थ ठोकळ यांनी केले तर आभार स्वत: अशोक श्रीखंडे याजी मानले व बैठफीचा समारोप केला.

महत्त्वाच्या बातम्या