खंडणीखोर जिल्हा परिषद सदस्याला बेड्या; २ करोडची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले

gulab parakhe1

टीम महाराष्ट्र देशा: २० करोड रुपयाच्या खंडणीची मागणी करून, २ करोड रुपयाची रक्कम स्विकारताना पुणे येथे शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील विकासकाकडे  २० करोड रुपयाच्या खंडणीची मागणी केली होती. दरम्यान, पोलिसांनी भादवि कलम ३८४ नुसार गुन्हा नोंद करून गुलाब पारखे याला अटक केली.

गुलाब पारखे हा पवईतील मोक्याच्या ठिकाणी कार्यालय असणाऱ्या नामांकित विकासकाबाबत विविध सरकारी कार्यालयांमध्ये माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करून, माहिती मिळवून, माहिती लपवण्यासाठी विकासकाकडे सतत खंडणीच्या पैशांची मागणी करत असे. तसेच पैसे दिले नाही तर सगळी माहिती उघड करून विकासकाला अडचणीत आणण्याची धमकी सुद्धा दिली जात होती.

पवई पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार “काही महिन्यांपूर्वीच १० लाख रुपये देण्यात आले होते, मात्र तेवढ्यावर त्याचे समाधान होत नव्हते. त्याच्याकडे असणारी माहिती उघड न करण्यासाठी विकासकाकडे २० करोड रुपयाच्या खंडणीची मागणी करत, मान्य करण्यास नकार दिल्यास मिडियाकडे जाण्याची धमकी दिली होती”

विकासकाच्या कार्यालयातून अधिकृत व्यक्तीने याबाबत पवई पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्ह्याची नोंद केली होती. सोबतच त्याने खंडणीची मागणी करणारे ऑडिओ सुद्धा पवई पोलीस ठाण्यात पुरावा म्हणून सादर केले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण अधिकारी, कर्तव्यावर असणारे अधिकारी यांच्या नेतृत्वात एक टिम बनवून, सापळा रचून खंडणीखोर गुलाब पारखे यास मुलुंड येथील एका हॉटेलमधून खंडणीची २ करोडची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

2 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...