आठवडाभरात शहराची कचराकोंडी संपेल: जिल्हाधिकारी नवलकिशोर राम

औरंगाबाद: जिल्हाधिकारी तथा प्रभारी महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी आज पडेगाव मिटमिटा भागातील रामगोपाल नगर येथील नागरिकांसोबत संवाद साधला. मराठवाड्यातील पर्यटनाची राजधानी म्हणून ओळख असलेल्या शहराला जर कचरामुक्त ठेवायचे असेल तर यात नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक मॉडेल तयार करण्यात येत असून एका आठवडाभरात शहराची कचराकोंडी संपेल असे जिल्हाधिकारी येथे बोलले.

सुंदर आणि स्वच्छ शहर ठेवण्याची नागरिकांना शपथ घ्यावी व ओला तसेच सुका कचरा यांचे कचराकुंड्यामध्येच वर्गीकरण करावे त्यामुळे ओला कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करता येईल त्यासोबतच सुका कचऱ्यापासून टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करता येतील. नागरिकांच्या कचरा,पाणी व रस्ता समस्या लवकरच सोडविण्यात येणार आहेत असेही यावेळी ते म्हणाले.तसेच कचऱ्यावर होत असलेल्या प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.यावेळी नगरसेवक रावसाहेब आम्ले, सुभाष शेजवळ यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

You might also like
Comments
Loading...