जिल्हा मध्यवर्ती बँकेला ६२ कोटींचा तोटा

सोलापूर : शेतकरी कर्जमाफीतून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सुमारे ४०० कोटी रुपयेे मिळतील. त्यामुळे पुढील वर्षी बँँकेला नफा होईल, अशी माहिती अध्यक्ष राजन पाटील यांनी दिली. संचालक मंडळाची गुरुवारी सभा झाली. तीत ३२० कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला.

चालू आर्थिक वर्षात बँकेला तरतुदीपूर्व ६२ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक आराखडा तयार करण्यात आला. त्याला संचालकांनी एकमताने मंजुरी दिली. २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी सर्व प्रकारच्या अपेक्षित उत्पन्न आणि खर्चाचा ढोबळमानाने अंदाज बांधण्यात आला. त्याचा गोषवारा सभेच्या पटलावर आल्यानंतर त्यावर चर्चा झाली.

कर्मचारी वेतनावरच ६२ कोटी रुपये खर्च होतात. उत्पन्नाचे स्रोत मात्र कमी होत गेले. व्याज सवलतींच्या रकमा शासनाकडेच अडकून पडल्या. त्यामुळे सुमारे १०० कोटींची ही रक्कम मिळाली, कर्जमाफीची रक्कमही जमा झाली तर बँक सुस्थितीत होईल, असे श्री. पाटील म्हणाले.

या वेळी बँकेचे उपाध्यक्ष जयवंतराव जगताप, संचालक आमदार सिद्धाराम म्हेत्रे, सुरेश हसापुरे, सुभाष शेळके, भारत सुतकर, शिवानंद पाटील, दीपक साळुंखे, चंद्रकांत देशमुख, सुनंदा बाबर आणि जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख उपस्थित होते.

१० हजार देण्याचा विषय संपला राज्यसरकारनेकर्जमाफी जाहीर केल्यानंतर तातडीने दहा हजार रुपयांची कर्जे देण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी बँकेकडे पुरेसा निधी नव्हता. शिखर बँकेने ६७ कोटी रुपये देण्याचे मान्य केले. परंतु त्याला जिल्ह्यातून कुठेच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तो विषय आता संपला. राजनपाटील, बँकेचे अध्यक्ष

You might also like
Comments
Loading...