fbpx

दहा हजार रुपये उचल मागणीसाठी जिल्हा बॅंकेकडे केवळ ५४६ अर्ज

नाशिक : खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये तातल देण्याची घोषणा राज्य सरकारने जुन महिन्यात केली होती. खरीप हंगाम संपत असताना आतापर्यंत अवघ्या २०७ शेतकऱ्यांनाच उचल देण्यात आली आहे. दहा हजार रुपये उचल मागणीसाठी केवळ ५४६ अर्जच जिल्हा बॅंकेकडे आले आहेत. यासाठी राज्य बॅंकेकडून ५४ लाख साठ हजार रुपये मंजूर जाले आहेत.

जून महिन्यामध्ये राज्य सरकारने कर्जमाफी देण्यास तत्वता मान्यता दिल्यानंतर त्याचे स्वरूप स्पष्ट होण्याआधी शेतकऱ्यांना खरीपासाठी तातडीची मदत म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपये उचल देण्याची घोषणा केली. मात्र त्यासाठीच्या अटी- शर्ती व गटसचीवांचा संप यामुळे शेतकऱ्यांना या योजनेला फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही.

जिल्हा बॅंकेने या उचलसाठी ९० हजार शेतकरी पात्र असल्याने राज्य बॅंकेकडे ९० कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव पाठविला होता. परंतु प्रत्यक्षात जिल्हा बॅंकेकडे केवळ ५४६ शेतकऱ्यांनी दहा हजार रुपये उचल मागण्याचे अर्ज केले. या अर्जांनुसार जिल्हा बॅंकेला राज्य बॅंकेने ५४ लाख ६० हजार रुपये दिले आहे. जिल्हा बॅंकेने या अर्जदार शेतकऱ्यांकडून योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून उचल वाटपास सुरूवात केली असून आतापर्यंत २०७ जणांना उचल दिली आहे. गटसचीव संपावर असल्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करण्यास अडचणी येत आहेत.