‘..तर शिवसेनेच्या मंत्र्यांना उस्मानाबाद जिल्हा बंदी करणार’, भाजप आ.राणा पाटलांचा इशारा

‘..तर शिवसेनेच्या मंत्र्यांना उस्मानाबाद जिल्हा बंदी करणार’, भाजप आ.राणा पाटलांचा इशारा

उस्मानाबाद : शेतकऱ्यांना गतवर्षीचा विमा नाही, यावर्षीचा अग्रिमही नाही. जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार आणि तीन आमदार असताना शिवसेनेने केले काय, असा प्रश्न उपस्थित करत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना जिल्हाबंदी करण्याचा इशारा दिला आहे.

दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने सातत्याने अन्याय केलेला आहे. शिवसेनेचे जिल्ह्यात तीन आमदार आणि एक खासदार असताना देखील खरीप २०२० चा मंजूर विमा बाधित शेतकऱ्यांना अजून पर्यंत मिळालेला नाही. ८० टक्के शेतकरी हक्काच्या नुकसान भरपाईपासून वंचित आहेत.

रब्बीचा विमा देखील मिळालेला नाही, खरीप २०२१ च्या अग्रिम विम्याचे आदेश होवून देखील प्रत्यक्षात काहीच कृती नाही आणि यात आताच्या नुकसानदायी अतिवृष्टीची भर पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून ते आर्थिक संकटात आहेत. मग शिवसेना नेमकी शेतकऱ्यांसाठी काय करत आहे, येत्या ७ दिवसांत पिक विम्याबाबत सकारात्मक कृती करावी अन्यथा शिवसेनेच्या मंत्र्यांना जिल्हा बंदी करून जाब विचारण्याचे काम शेतकऱ्यांसह भाजप करेल असा इशारा दिला.

महत्त्वाच्या बातम्या