जिल्हा प्रशासनानेही भगवान गडावरील दसरा मेळाव्यास परवानगी नाकारली

अहमदनगर : भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यासाठी पंकजा मुंडे यांनी महंत नामदेव शास्त्री यांना भावनिक पत्र लिहून आवाहन केले होते. त्याचबरोबर जिल्हा प्रसासानाकडे देखील याबाबतची परवानगी मागितली होती. परंतु, पोलिसांचा गोपनीय अहवाल आणि अर्जदाराकडे विश्वस्तांचं ना हरकत प्रमाणपत्र नसल्याने परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली नाही.

यात विशेष बाब म्हणजे पंकजा मुंडे समर्थकांनी पालक मंत्री राम शिंदे यांना साकड घालत गडावर मेळाव्यास परवानगी मिळावी म्हणून विनवणी केली होती, पण यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील अस सांगत पालकमंत्री राम शिंदे यांनी आपले हात वर केले आहेत. स्व.गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक असलेले राम शिंदे यांनी पंकजा मुंडे यांच्या बाबतीत मात्र हात वर केल्याने चर्चेला उधान आले आहे.

Loading...

दरम्यान, मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर असल्याने या सगळ्या घडामोडींना नवं वळण लागण्याची शक्यता आहे. आधीच जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांची आस काही लपून नाहीये. त्यामुळे पंकजा समर्थक याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धक्का समजून आपली भावना व्यक्त करतील अशी चर्चा रंगत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!