स्नेहबंध पुरस्काराचे महंत सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते वितरण

अहमदनगर: स्नेहबंध सामाजिक प्रतिष्ठान तर्फे आयोजित रांजणगाव मोहत्सवानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस दिल्या जाणाऱ्या स्नेहबंध पुरस्काराचे वितरण महंत सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश वाळुंजकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले व सत्कारमूर्तींची ओळख व कार्य यांच्या विषयी माहिती दिली. सामाजिक क्षेत्रात कैलास बापू कोते , उद्योग क्षेत्रात सचिन देसरडा, प्रशासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे , कृषी क्षेत्रात दिनेश गुगळे, व पत्रकारिता क्षेत्रात गोरक्षनाथ मदने यांना हा स्नेहबंध पुरस्कार देण्यात आला आहे. तरुणांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही व हिंमत असेल तरच समाजात किंमत आहे असे प्रतिपादन महंत सुनीलगिरी महाराज यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की तरुणांनी सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले पाहिजे, ग्रामीण भागातील विद्यार्थी हा उच्चस्तरीय शासकीय सेवेत असला पाहिजे त्यासाठी त्याने प्रयत्न केले पाहिजे असे वाकचौरे यांनी सांगितले.

पुरस्कराला उत्तर देताना सचिन देसरडा म्हणाले की , व्ययवसाय करताना यश – अपयश येत असतात अपयशाला खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने प्रयत्न केले पाहिजे. व ग्रामीण भागातील उद्योजकाला हा पुरस्कार दिल्याने यातून नवी प्रेरणा मिळाली आहे असे देसरडा यांनी सांगितले. आदेश जावळे यांनी आभार मानले व सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, सोपान पेहेरे, राहुल शिरसाठ, सचिन वाळुंजकर, सागर आल्हाट, शरद वाकचौरे,भाऊसाहेब चौधरी, सचिन जावळे, दीपक आगळे, रामा जावळे,अजित चौधरी, राजेंद्र पेहेरे, अण्णा जावळे ,दत्तात्रय सुसे रोहन वाळुंजकर,अमोल लोखंडे,आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सविता नवले यांनी केले.

You might also like
Comments
Loading...