शेवगावमध्ये होतोय दुषित पाणीपुरवठा ; ‘बोंबाबोंब’ करून केला निषेध !

रवी उगलमुगले / शेवगाव : गेल्या महिन्यापासून शेवगाव शहराला मिळत असलेल्या पिवळ्या व गाळमिश्रित पाण्यामुळे शेवगाव कर नागरिक हैराण झालेली आहेत. तसेच या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली आहे.आज शेवगाव मधील बहुतेक दवाखान्यामध्ये कावीळ, अतिसार, टायफाईड याचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आज विविध पक्ष्यांच्या वतीने शेवगाव परिषदेसमोर आज शेवगावाचे नागरिक व विविध पक्षांच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

यावेळी या बोंबाबोंब आंदोलनात बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पवन कुमार साळवे यांनी शेवगाव नगरपरिषद प्रशासनाचा निषेध करत , लवकरात लवकर शुद्ध पाणी मिळावे,व नगरपरिषद प्रशासनाच्या ढासळत असलेला आलेख याबद्दल नाराजी व्यक्त केली. व शोगाव नगरपरिषदेला स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मिळावी असे जिल्हा रिपब्लिकनचे पवनकुमार साळवे यांनी सांगितले.

Loading...

यावेळी बोलताना अँड. अविनाश मगरे जयकवाडी धरणाच्या भिंतीपासुन नवीन पाणीपुरवठा योजना शेवगाव साठी करण्यात यावी त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होणार नाही नगरपरिषदेचा कारभाराची चौकशी करण्यात यावी, तसेच भाजपा व राष्ट्रवादी यांची मिलीभगत नगरपरिषदेमध्ये आढळत असल्यामुळे शेवगाव शहराचा विकास होण्याऐवजी शवगाव शहराला बकाल स्वरूप आले आहे व जनतेच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे प्रत्येक घराघरात आज टायफॉईड,कावीळ, अतिसार याचे पेशंट आढळत असल्याचे अँड. अविनाश मगरे यांनी बोलताना सांगितले.

यावेळी माजी सभापती व शिवसेना नेते अविनाश मगरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ कुसळकर, शेवगाव शहर अध्यक्ष सुनील जगताप, युवा सेना तालुका प्रमुख शितल पुरनाळे, अंकुश लोंढे,कॉम्रेड संजय नांगरे, पवन कुमार साळवे, विजय बोर्ड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष दत्तात्रेय फुंदे, हमीद पठाण, राजू मगर, प्रकाश तुजारे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय जोशी इ. शेवगावकर नागरिक हजर होते.

यावेळी प्रशासनाच्या वतीने शेवगाव पंचायत समितीचे कक्ष अधिकारी बापू चव्हाण यांनी निवेदन स्वीकारले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
भाजपच्या धास्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले ; सरकारमधील दोन नेत्यांचे राजीनामे
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला