अबू आझमींशी वाद, महिला पोलिस निरिक्षकाची तडकाफडकी बदली

Abu Azam

मुंबई : राज्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असतानाच नेते मंडळी आणि अधिकारी यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू अझीम यांच्याशी वाद झाल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर गुरुवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांची बदली झाली. हा व्हिडिओ समोर आल्याच्या एका दिवसानंतर शर्मा यांची बदली झाली. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्यांचा प्रवासी कामगारांच्या प्रश्नावर आझमी यांच्यासोबत वाद झाला होता.

श्रमिकांना होणारा त्रास आणि त्यांची गैरसोय याचा विरोध करण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते खासदार अबू आझमी यांनी नागपाडा येथे रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर ही बदली करण्यात आली आहे. त्यामुळे या बदलीमागे राजकीय दबाव तर नाही ना, अशी चर्चा पोलीस वर्तुळात आहे.

दरम्यान, आंदोलन करणा-या आणि महिला पोलिसाचा अनादर करणा-या आझमी यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी लेखी तक्रार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. यातच गुरुवारी शर्मा यांची चेंबूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली.

दरम्यान, शालिनी शर्मा यांनी बदलीसाठी अर्ज केला होता, असे वरिष्ठ पोलिस अधिकारी सांगत आहेत. मात्र बदलीमागचे नेमके कारण गुलदस्त्यातच आहे.

कामगार नेण्यासाठी परवानगीची गरज नाही, योगी सरकारचा ‘यु-टर्न’

शेतकऱ्यांना जेरीस आणणारी टोळधाड म्हणजे नक्की काय ?

अबू आझमी म्हणतात…राज ठाकरे कोण आहेत?