शिवसेनेतील वाद क्षमला? यंदा केवळ गुलमंडीत झाले ध्वजारोहण

औरंगाबाद : ८ जून १९८५ रोजी मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेना शाखेचा ३६ वा वर्धापनदिनाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते गुलमंडी येथे ध्वजारोहण करण्यात आले. गेल्या वर्षी क्रांती चौकात झालेल्या ध्वजारोहणामुळे शिवसेनेतील दुफळी समोर आली होती. यंदा मात्र, एकाच ठिकाणी ध्वजारोहण झाले. मात्र, या वेळी जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे उपस्थित नव्हते.

या कार्यक्रमाला आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाठ, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह पक्षाचे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आमदार अंबादास दानवे आणि पक्षात पुन्हा आलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी हे दोघेही उपस्थित नव्हते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही शिवसेना औरंगाबाद शाखेचा वर्धापन दिन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

शिवसेनेच्या वतीने पारंपारीक पद्धतीने एकाच ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले असले तरी आमदार अंबादास दानवे उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवसेनेतील हा वाद क्षमला का? असा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. त्यामुळे आगामी निवडणुकीपर्यंत तरी त्या संदर्भात कोणतेही भाष्य करणे योग्य ठरणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या