फेसबुक आणि ऑस्ट्रेलिया सरकार मधील वाद शमाला फेसबुकची सेवा पूर्ववत

फेसबुक

ऑस्ट्रेलिया: सोशल मिडिया प्लाटफॉर्म आणि सर्च इंजिन मुळे लोकांना जगभरातील माहिती एका क्लिकवर मोफत मिळवण्याची मोठी संधी गेल्या काही वर्षांपासून उपलब्ध झाल्याने जग इतकं जवळ आले की, जग एक खेड बनलं आहे. मात्र आता या प्लॅटफॉर्म साठी पैसे मोजावे लागणार होते. याचे कारण म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये पारित झालेलं एक विधेयक यामध्ये हे प्लॅटफॉर्म विनामूल्य इतरांची माहिती लोकांना दाखवाटता यामध्ये विशेषतः मोफत दाखावल्या जाणऱ्या बातम्यांच्या द्वारे हे प्लॅटफॉर्म करत असलेल्या कमाई वर या विधेयकात आक्षेप घेण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी त्वरेने गूगलला फटकारताना स्पष्ट केले की, आम्ही इशाऱ्यांना भीक घालत नाही, तुम्ही ऑस्ट्रेलियात काय करू शकता याची नियमावली आम्हीच तयार करतो, असे मॉरिसन यांनी ब्रिस्बेन येथे वार्ताहरांना सांगितले. ऑस्ट्रेलियाच्या संसदेत निर्णय घेण्यात आला आहे, आमच्या सरकारने निर्णय घेतलेला आहे, ऑस्ट्रेलियात तशाच पद्धतीने काम होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर फेसबुकने आपल्या माध्यमातून न्यूज पाहण्यास आणि शेअर करण्यास यूझर्सला बंदी घेतली आहे. सध्या फेसबुकचे ऑस्ट्रेलियातील मीडिया लॉ वरून सरकारशी संघर्ष सुरू आहे. हे प्रकरण एवढं वाढलं की, ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुकने आपले पेज देखील बंद केले होते.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया सरकारने फेसबुक आणि गुगलकडे ऑस्ट्रेलियातील बातम्यांसाठी शुल्क आकारण्याच्या नवा कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडल्यामुळे फेसबुक आता ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रे दाखविण्यास सुरूवात करेल, असे कोषाध्यक्ष जोश फ्रायडनबर्ग यांनी मंगळवारी सांगितले.

या काळात ऑस्ट्रेलियामधील युजर्सना फेसबुकच्या माध्यमातून न्यूज पोस्ट बघता किंवा शेअरही करता येत नव्हत्या. फेसबुकच्या या निर्णयाचा फटका हवामान विभाग, आरोग्य विभाग आणि पश्चिम ऑस्ट्रेलियातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना बसला होता. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या युजर्ससोबतच ऑस्ट्रेलियाबाहेर असलेल्यांनाही फेसबुकवर ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याच बातम्या वाचता येत नव्हत्या.

“आम्हाला खात्री आहे की ऑस्ट्रेलियन सरकारने बर्याच बदलांवर सहमती दर्शविली आहे आणि आम्ही हमी देतो की आम्हाला त्यांच्याकडून मिळणाऱ्या मूल्यांच्या तुलनेत प्रकाशकांना दिले जाणारे मूल्य याची जाण ठेवू”, असे फेसबुकने सांगितले आहे .

महत्वाच्या बातम्या