डॉ. आंबेडकरांच्या फलकावरुन वाद,सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांचा धुडघूस

सांगली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेला फलक महापालिकेच्या अतिक्रमण निर्मृलन पथकाने हटवल्याच्या रागातून पथकाचे प्रमुख दिलीप घोरपडे यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी दोनशेहून अधिक जमावाने पालिकेवर हल्ला करुन प्रभाग समिती एकच्या कार्यालयाची तोडफोड केली. घोरपडे यांना बेदम मारहाणही केली. या घटनेच्या निषेधार्थ कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

काय आहे प्रकरण ?
शहरात आंबेडकर जयंतीनिमित्त चौका-चौकात डिजीटल फलक लावण्यात आले होते. ते काल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढले. शहरातील फलक काढल्यामुळे काही संघटनेचे कार्यकर्ते नाराज झाले. त्यांनी सोमवारी महापालिकेच्या प्रभाग 1 कार्यालयात घुसून तोडफोड सुरू केली. टेबल, खुर्च्या, टेबलावरील काचा, खिडक्या, संगणक फोडले. कपटाचे कुलुप काढून साहित्य फेकून दिले. महापालिकेतील अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकारी दिलीप घोरपडे यांनाही मारहाण करण्यात आली.

दरम्यान महापालिकेतील अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी मनपा कर्मचारी संघटनेतर्फे निषेध करून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. सांगली शहर पोलिसांनी महापालिकेसमोर तत्काळ बंदोबस्त वाढवला असून तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

14 Comments

Click here to post a comment