मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षाची परंपरा असलेला दसरा मेळावा (Dussehra Melawa) ४ ऑक्टोंबर रोजी दोन ठिकाणी पार पडला. यंदाचा मेळावा ५६वा दसरा मेळावा असून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याचं आयोजन केलं होतं. या दोन्ही मेळाव्यांमध्ये नेत्यांच्या वक्तव्यांकडे सर्वांचं लक्ष असतानाच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लांबलचक भाषण केलं त्यामुळे इतर नेत्यांना आपलं मत मांडता आलं नाही. यावरुन शिंदे गटातील नेते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यावर शिंदे गटातील उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाषण करणाऱ्यांमध्ये माझं नाव होतं, मात्र, वेळ झाल्यामुळे पुढाकार घेऊन कोणीतरी थांबवणं गरजेचे होतं. सर्वांनीच भाषण केलं असतं तर रात्रीचे अकरा वाजले असते. त्यामुळे मी स्वतः एकनाथ शिंदेंना भाषण करणार नसल्याचे सांगितलं. त्यामुळे कोणी नाराज होण्याचं कारण नाही, दसरा मेळाव्यासाठीच्या पूर्ण नियोजनामध्ये मी होतो, असं स्पष्टीकरण उदय सामांतांनी दिलं आहे.
शिंदेंनी साधारण दीड तास भाषण केलं होतं. एकनाथ शिंदे यांना राज्यातील जनतेने स्वीकारलं असून त्यांचे विचार ऐकण्यासाठी तिप्पट चौपट गर्दी होती, असे देखील सामंत म्हणाले. दसरा मेळाव्यातून शिवसेना पक्ष कोणाचा आहे हे देखील सिद्ध झालं आहे, शिवाजी पार्कवर किती खुर्च्या लागल्या, किती माणसे बसू शकले याची माहिती मुंबई पालिका तसेच पोलिसांकडे आहे. त्याच प्रकारे बीकेसी मैदानावरील माहिती सुद्धा पोलिसांकडे आहे, त्यामुळे स्वतःचं समाधान करून घेण्यासाठी आमचा दसरा मेळावा अतिविराट झाला, असं ते म्हणत असल्याचा टोला उदय सामांतांनी लगावला आहे.
दरम्यान, राहुल शेवाळे (Rahul shewale) यांनी शिंदेंच्या मेळाव्यात भाषण केलं होतं. यावेळी मला स्वप्नातही वाटलं नाही की, मी राहुल रमेश शेवाळे याला या व्यासपीठावर भाषण करण्याची संधी मिळेल. मी राहुल रमेश शेवाळे या नावाचा वापर वारंवार करत आहे, कारण मी कुणाचा बाप चोरलेला नाही. माझं नाव राहुल रमेश शेवाळे आहे. माझे वडील रमेश संभाजी शेवाळे हे होते, हे तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो. कारण वारंवार आमच्यावर आरोप होतो की माझा बाप चोरला, असं शेवाळे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Skin Care Tips | कॉफी फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यावर मिळतील ‘हे’ फायदे
- Devendra Fadnavis | “सत्तास्थापनेवेळी फडणवीस राज्यपालांना भेटलेच नाहीत” ; राज्यपाल कार्यालयाने दिली खोटी माहिती माहिती
- Ajit Pawar । “शिंदे दिल्लीला गेले आणि हात हलवत परत आले”; अजित पवार यांची खोचक टीका
- Health Tips | अतिप्रमाणात गरम पाणी पीत असाल तर ते आताच थांबवा, कारण आरोग्यासाठी ते हानिकारण
- Jayant Patil | मोहन भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…