रेल्वेत जेवणाची ऑर्डर वेळेत न मिळाल्यास प्रवाशांना मिळणार डिस्कांऊट

ऑनलाइन जेवणाची ऑर्डर रद्द केल्यास कोणतेही शुल्क लागू होणार नाही

टीम महाराष्ट्र देशा : रेल्वेत जेवणाची ऑर्डर वेळेत न मिळाल्यास प्रवाशाला १०० रूपयांपर्यंत डिस्कांऊट दिला जाणार आहे. ही ऑफर फक्त एक ऑर्डर मिस झाल्यानंतर मिळणार आहे. आदीची ऑर्डरवर लेट झाल्यानंतर पुढच्या ऑर्डरमध्ये १०० रूपये कमी केले जाणार आहेत. या संदर्भात रेल्वे विभागाने नियमात काही बदल केले आहेत. त्यामुळे यापुढे जर जेवण ऑर्डर केलेल्या वेळेत जर नाही आले तर तुमचे पैसे परत मिळणार आहेत. उशिरा धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना मात्र ही सुविधा नसल्याच देखील रेल्वे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेमेंट करू शकता.

ऑनलाइन केलेली जेवणाची ऑर्डर जर रद्द केली तर यापूर्वी शुल्क लागू केले जात होते. मात्र, आयआरसीटीसीने आता ऑनलाइन जेवणाची ऑर्डर रद्द केल्यास कोणतेही शुल्क लागू होणार नाही असे सांगितले आहे. यासाठी डिलिव्हरी वेळेच्या आधी २ तास ऑर्डर रद्द करणे गरजेचे आहे. त्यामुळे या निर्णयाचा रेल्वे प्रवाशांना फायदा होईल.

You might also like
Comments
Loading...