वाकडी येथील घटनेमुळे महाराष्ट्राची बदनामी – रामदास आठवले

रामदास आठवले

औरंगाबाद : भाजपचे सरकार असले तरी कोणावरच अन्याय व्हायला नको. वाकडी येथे घेडलेला प्रकार दुर्दैवी व निंदनीय असून समाज न्याय खात्याने त्यांना 1 लाख रुपये मदत जाहीर केला आहे. या केस मधील आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. तसेच पीडित मुलांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण दिल जावं, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. ते आज औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला काळीमा फासणारी ही घटना जळगाव येथील जामनेर तालुक्यातील वाकडी गावात घडली आहे. मातंग समाजातील काही मुले विहिरीत पोहली म्हणून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

रामदास आठवले म्हणाले, कोरोगाव-भीमा दंगल पूर्वनियोजित होती. संभाजी भिडे यांच्या सभेला परवानगी देऊ नये. तसेच एल्गार परिषदेच्या आयोजकांना अटक झाली असून ते माओवादी होते. इतर कोणाची चौकशी करणं गरजेचं नाही कारण ते आंबेडकर वादी आहेत.