टीम महाराष्ट्र देशा: भारतीय टेलिव्हिजन वरील लोकप्रिय शो तारक मेहता का उलटा चष्मा मधील दिशा वकानी म्हणजेच सर्वांची लाडकी दयाबेन ने शो मध्ये सध्या दिसत नसली तरी तिची लोकप्रियता तेवढीच आहे. दिशाचे दयाबेनचे पात्र भारतीय टेलिव्हिजन वरील सर्वात लोकप्रिय पात्र आहे. चाहत्यांना तिच्या बोलण्याचे तिच्या हसण्याचे नवल वाटते. कारण दियाबेनने स्वतःची एक वेगळी बोलण्याची शैली विकसित केली आहे. तिच्या या अनोख्या बोलण्याच्या शैलीमुळे तिची फॅन फॉलोविंग वाढली आहे.
सध्या सर्वांच्या लाडक्या दायाबेनला घशाचा कॅन्सर झाल्याच्या बातम्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. शोमध्ये दिशा तिच्या वेगळ्या आवाजात बोलत असल्याने तिला हा रोग झाला असेल का? अशा बातम्या देखील समोर येत आहे. घशाच्या कॅन्सरमुळे दिशेने दीर्घकाळ चालणाऱ्या टीव्ही शो मधून ब्रेक घेतल्याची देखील माहिती मिळत आहे.
तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये दयाबेनचा भाऊ सुंदर उर्फ मयूर वकानी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ” मीडियामध्ये येणाऱ्या या सर्व बातम्या खोट्या असून, यापैकी कोणताही दावा खरा नाही. दिशा एकदम निरोगी आहे. चाहत्यांनी दररोज उडणाऱ्या अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.”
देशाचा शो मधील आवाज आणि मूळ आवाज यामध्ये खूप फरक आहे. एका जुन्या मुलाखतीत दिशाने सांगितले होते की, ” शोसाठी हा वेगळा आवाज काढणे माझ्यासाठी खूप कठीण आहे.”
आवाज आणि घशाचा कॅन्सर यांचा संबंध
कॅन्सर जेव्हा व्होकल कार्डमध्ये वाढत जातो तेव्हा तो घशाचा कॅन्सर असतो. मद्यपान धूम्रपान वायरल इन्फेक्शन आणि गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीज यामुळे घशाचा कॅन्सर होऊ शकतो. जाणीवपूर्वक आवाजातील बदल याचा त्याच्याशी थेट संबंध येत नसला तरी टोन मध्ये बदल हे कॅन्सरच्या या स्वरूपाचे सुरुवातीचे लक्षण आहे.
या कारणांमुळे देखील घशाचा कॅन्सर होऊ शकतो
- खाताना किंवा पाणी पिताना घशामध्ये दुखणे.
- मानेमध्ये गाठ निर्माण होणे.
- दीर्घकाळ खोकलने
- चालताना दम लागणे
- कानामध्ये असह्य वेदना होणे
- सतत घसा खवखवत राहणे.
- अति थकवा येणे देखील घशाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.
चाहते दयाबेन ची आतुरतेने वाट बघत आहेत
दिशाला शो मधून ब्रेक घेऊन आता खूप दिवस झाले आहेत. पण तरीही तिचे चाहते तिच्या शोमध्ये परतण्याची वाट पाहत आहेत. तारक मेहता का उलटा चष्मा हा टेलिव्हिजन वर सर्वात जास्त चालणारा टीव्ही शो आहे. या शो चे आतापर्यंत 3500 हून अधिक एपिसोड प्रसारित झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Rutuja Latake । “तुम्ही लटकेंचा राजीनामा स्वीकारताय की नाही ते सांगा”; हायकोर्टाचा बीएमसी आयुक्तांना इशारा
- Kishori Pednekar | “उद्धव ठाकरेंची कोंडी करून, शिवसेना पक्षालाच…”; किशोरी पेडणेकरांचा विरोधकांवर निशाणा
- UPSC Recruitment | UPSC यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
- Hizab Case | न्यायाधीशांचे एकमत नसल्याने हिजाब प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे
- Explained | ऋतुजा लटके यांचा राजीनामा न स्विकारण्यामागे भाजपचा डाव?