‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’ मध्ये दिशा पटानी

‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’ मध्ये आलियाच्या ऐवजी दिशा पटानी ही मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे पक्के झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटाच्या चित्रीकरणाला एप्रिल पासून सुरुवात होणार आहे.

चित्रपटात मुख्य भूमिकेत टायगर श्रॉफ आहे तर दिशा पटानी नायिका असेल. टायगरमुळेच दिशाने या चित्रपटात काम करण्यास होकार दिला असल्याचे सूत्रांकडून समजते.

‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’ मधुन सारा अली खान पदार्पण करेल अशी हि चर्चा होती. पण वडील सैफ अली खान ला ‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’ सारा ने काम न करावे असे वाटते.

करणसोबत काम करुन साराचा प्रवास हा आलियासारखा होईल, अशी सैफला भीती आहे. त्यामुळे दिशा पटानी ‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’ ची नायिका म्हणून पक्के झाले आहे.