पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आलेला भूकंप अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीये. शिवसेना नेते विजय शिवतारे (vijay shivtare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठींबा दिल्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. यानंतर विजय शिवतारे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवत चांगलाच टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर देखील घणाघात केला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
“वैद्यकीय क्षेत्रात स्किझोफ्रेनिया नावाचा एक रोग आहे. अशा माणसाला बाकीचे काही रोग नसतात. बहुतेक हा रोग हुशार माणसाला होतो. ही माणसं अतीविचाराच्या गर्तेत जातात आणि तिथे पाण्यात डुंबून जातात आणि वेगवेगळ्या प्रकारचे भास त्यांना होत असतात,” असा टोला विजय शिवतारे यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
विजय शिवतारे यांनी संजय राऊतांनी हे घडवून आणल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी संजय राऊतांची निष्ठा शिवसेनेशी किती आहे आणि शरद पवारांशी किती आहे हे महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती असल्याचे शिवतारे म्हणाले. जे महाराष्ट्राला कळते ते उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना कळत नाही. खालच्या पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जुळवून घ्या, असे उद्धव ठाकरे काल म्हणाले. त्यामुळे हे काय गारूड आहे? भानामती आहे की काय? हिप्नॉटिजम आहे की काय?, असा प्रश्न पडला असल्याचे विजय शिवतारे म्हणाले.
हकालपट्टीवर विजय शिवतारे म्हणाले, “तुम्ही काय माझी हाकलपट्टी करणार, मीच शिवसेना सोडलीये. 29 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन मी माझी भूमिका स्पष्ट केली. आम्हाला महाविकास आघाडी अमान्य आहे. शिवसेनेत फूट पडण्यास संजय राऊतच जबाबदार असून त्यांच्यामुळेच सर्व काही घडत आहे. त्यांची उद्धव ठाकरेंबाबत आणि शरद पवारांबाबत निष्ठा किती हे सर्वांना ठाऊक आहे.”
गेल्या महिन्यात ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला फटकारले आणि पुढच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासोबत आलेला एकही आमदार पराभूत झाला तर राजकारण सोडेन, अशी घोषणा केली.
स्वतंत्र संसार मांडा – संजय राऊत
“शिवसेना सोडली म्हणल्यावर आता अपेक्षा न ठेवता आपला स्वतंत्र संसार मांडा. बंडामुळे पक्षाला काही एक फरक पडणार नाही. शिवसेना-शिवसेना करण्यापेक्षा पक्षाची स्थापना करून मतदारांपुढे जा , म्हणजे अस्तित्व लक्षात येईल. ही बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आहे आणि भविष्यातही राहिल.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
स्वाभिमानाचा मुद्दा घेऊन बंड केलेल्यांकडे आता स्वाभिमान दाखवून द्यायची संधी आहे. आता शिवसेनेच्या पंखाखाली राहून आपला स्वाभिमान जपू नये. अनेकांनी पक्ष सोडूनही शिवसेना नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवस उजाडत नाही त्यांना स्वत:चा स्वाभिमान दाखवून द्यावा. असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Vijay Salvi | “उद्धव ठाकरे यांच्या समोरच एकनाथ शिंदेंचा फोन आला होता, मात्र…”; विजय साळवींचा खुलासा
- Vijay Shivtare : “तुम्ही काय माझी हाकलपट्टी करणार मीच…”, विजय शिवतारेंचा शिवसेनेला टोला
- Uddhav Thackeray | पालघर जिल्ह्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष शिंदे गटात सामील
- Mahesh Tapase | देवेंद्र फडणवीस ४० आमदारांचा प्रस्ताव घेऊन राज ठाकरेंकडे गेले होते?- महेश तपासे
- Sanjay Raut : “शिवसेनेच्या पंखाखाली राहून स्वाभिमान जपू नये…”, संजय राऊतांचे बंडखोर आमदारांना आव्हान
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<