समन्वय समितीच्या बैठकीत महामंडळांसदर्भात झाली चर्चा ; ‘असे’ होणार वाटप

mahamandal

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्रात कॉंग्रेस,शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाविकास सरकार आहे. परंतु कॉंग्रेस सातत्त्याने आगामी निवडणुकींसाठी स्वबळाचा नारा देत असताना दिसत आहे. त्यातच शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसेनापक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधून बोचरी टीका केली.

तर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं लेटरबॉम्ब समोर आलं आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सध्या सत्तेत सोबत असलेले मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत आहेत, असा खळबळजनक आरोपही प्रताप सरनाईक यांनी या पत्रातून केला आहे.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी समन्वय समितीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. या चर्चेमध्ये महामंडळं आणि इतर विषयांवर चर्चा झाली. प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाचे नेते या बैठकीला हजर होते. महामंडळांसदर्भात चर्चा झाली तीन पक्षांना महामंडळाचं वाटप होईल. आमदारांच्या संख्येप्रमाणं महामंडळाचं वाटप होईल, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

शिर्डी साईबाबा संस्थान अध्यक्षपद अखेर राष्ट्रवादीला तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूरचं अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्यात आलं आहे. शिर्डी साई संस्थान अध्यक्षपदावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी दावा केला होता. आजच्या बैठकीत शिर्डीचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर पंढरपूरचं अध्यक्षपद काँग्रेसला देण्याचा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP