वॉशिंग्टन : US Capitol Violenceनं गुरुवारी संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. राजकीय वर्तुळाला या घटनेनं खडबडून जाग आली आणि एक जबर हादराही बसला. विविध स्तरांतून आणि जागतिक पातळीवर नावाजलेल्या अनेक राजकीय नेतेमंडळींनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली, तर कोणी डोनाल्ड ट्रम्प यांना आणि त्यांच्या धोरणांन धारेवर धरलं.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक हरल्यापासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मानसिक संतुलन ठीक नसल्याची शंका घेतली जात असून त्यांच्या सहकाऱ्यांनीच ट्रम्प यांच्या मानसिक स्थितीवर प्रश्नचिन्ह लावले असल्याचे सांगितले जात आहे.zee 24 तासने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
डेली मेल मधील रिपोर्टनुसार निवडणूक हरल्यापासून ट्रम्प स्वतःची विधाने सतत बदलत आहेत. ट्रम्प यांच्या कॅबिनेट मधील सदस्य व रिपब्लिकन नेते यावर चर्चा करत असून गेले काही दिवस ट्रम्प ज्या पद्धतीने वर्तणूक करत आहेत ते पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा दावा फेटाळणे अशक्य असल्याचे सांगत आहेत.
व्हाइट हाऊस मधील कर्मचाऱ्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मानसिक स्थितीवर प्रश्न भे केले आहेत. त्यांनी अशी तक्रार केली आहे की, ट्रम्प एकट्यात काही ना काही बडबडत असतात. एवढंच नाही तर ओरडतही असतात. मात्र याबाबत कुणीही अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही.
महत्वाच्या बातम्या
- ब्राह्मण पुजाऱ्यांच्या विवाहासाठी ‘या’ राज्यात ‘ब्राह्मण मॅरेज स्किम’
- ‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे’
- राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील अडचणी तातडीने दूर करा – उद्धव ठाकरे
- ठाण्यातील औद्योगिक भूखंड व्यवहार प्रकरणी फेरतपासणीचे नाना पटोले यांचे आदेश
- नोरा फतेहीला करायचे तैमूरशी लग्न, करीना म्हणाली…