गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी नगरमध्ये येणार सिंघम शिवदिप लांडे ?

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना अपयश आल्याचे वास्तव आहे. खुन अवैध्य धंदे मटका इत्यादी बेकायदा धंदे जोरात असतांना जाणीवपुर्वक पोलीस यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. केडगाव येथील दूहेरी हत्याकांडाने कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून आता खमक्या अधिकाऱ्याची गरज जाणवू लागली आहे. तशी वरिष्ठ पातळीवर चर्चाही सुरू झाल्याची माहिती पूढे आली आहे.

नगरची गुंडगिरी, दादागिरी, अवैध धंदे व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मूळचे अकोल्याचे असलेले बिहारचे सिंघम ठरलेले शिवदिप लांडे यांची नगरला बदली करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बिहार मध्ये नियुक्ती असताना लांडे यांनी गुंडगिरी मोडीत काढत कायद्याचा दरारा निर्माण केला. शिवदिप लांडे आता मुंबईत कार्यरत आहेत. त्यांची नगरला बदली केली तर नगरचे झालेले बिहार ही टिका कूठेतरी पुसली जाईल. तसेच मध्यंतरीच्या काळात नगरच्या वाढत्या गुंडाराजचा पर्दाफाश ज्योतीप्रिया सिंग या महीला अधिकाऱ्याने केला होता. त्यामुळे जिल्ह्यात आता लांडे की सिंग अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

You might also like
Comments
Loading...