राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या नावाची चर्चा

टीम महाराष्ट्र देशा : राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन यांचा कार्यकाळ या महिन्यात संपणार आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात या पदासाठी निवडणूक होणार आहे. आता राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी विरोधकांकडून राष्ट्रवादीचा उमेदवार पुढे केला जाण्याची शक्यता. तृणमूल काँग्रेस कडून सुकेंदू शेखर रॉय यांनी नकार दिल्यानंतर आता वंदना चव्हाण यांच्या नावाबद्दल चर्चा सुरु आहे.

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी 123 मतांची गरज आहे.भाजप ६९ जागांसह सभागृहात सर्वात मोठा पक्ष असला तरी एनडीएचा आकडा बहुमतापासून दूर आहे.आपले काही मित्र पक्ष आणि अपक्ष अशी जोडतोड करून 115 पर्यंत भाजपचा आकडा पोहोचतो.पण तेरा खासदार असलेली AIDMK कुठल्या बाजूने मतदान करणार हे स्पष्ट नाही. दरम्यान, वंदना चव्हाण यांची वर्णी जर राज्यसभेच्या उपसभापती पदी लागली तर पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला जाईल यात शंका नाही.

bagdure

तर “पावसाळी अधिवेशनासाठी आत्ताच दिल्ली येथे पोहोचले आहे, मलाही माध्यमांच्या मार्फतच ही बातमी कळाली अद्याप आपल्याला याबाबत कुठलीही कल्पना नाही. उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असून यामध्ये मांडण्यात येणार जनतेचे प्रश्न सध्या महत्वाचे आहेत, पक्षश्रेष्ठी देतील ती जबाबदारी स्वीकारायला आपण तयार आहोत” अस मत खासदार वंदना चव्हाण यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना वक्त केलं आहे.

दुधाची पिशवी विकणाऱ्याला जेवढे कमिशन मिळते तेवढेही शेतकऱ्याला मिळत नाही – अजित पवार

 

 

You might also like
Comments
Loading...