राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा : संजय राऊत

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील नेतृत्व बदलाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाहांना घ्यायचा आहे. पण मोदी सध्या परदेशात असताना राज्यातली परिस्थिती चिंताजनक झाली आहे. राजकीय पडद्यावरुन सरकार गायब होणं अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने बघ्याची आणि पळपुटी भूमिका घेऊ नये, अशी जहरी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तर राज्यात नेतृत्व बदलाचे वारे वाहत असल्याचा मोठा दावा संजय राऊत यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राज्यभरात सुरु असलेलं मराठा क्रांती मोर्चाचे हे आंदोलन काही ठिकाणी शांततेत सुरु आहे, तर काही ठिकाणी याला हिंसक वळण लागलं आहे. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील परळीतही 18 जुलैपासून मराठा मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं, जे अद्याप सुरुच आहे.

ही जादूची झप्पी नाही तर मोदींसाठी मोठा धक्का आहे – संजय राऊत 

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.
You might also like
Comments
Loading...