fbpx

गिरीश महाजन आणि अण्णा हजारेंची बंद खोलीत चर्चा

टीम महाराष्ट्र देशा- लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांना विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ सत्ताधारी पक्षाचे नेते गिरीश महाजन देखील अण्णांंच्या भेटीला राळेगणसिद्धी येथे दाखल झाले आहेत.

अण्णा हजारे हे लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी गेले ४ दिवस उपोषणाला बसले आहेत. त्यासंदर्भातच चर्चेसाठी राज्याचे जलसंपदा मंत्री आता अण्णांच्या भेटीला राळेगणसिद्धी येथे आले आहेत. ही चर्चा बंद खोलीमध्ये सुरु आहे.

याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अण्णांची भेट घेतली होती.पाठींबा देण्यासाठी गेलेल्या राज ठाकरे यांनी सरकारवर तोफ डागली. अण्णांच्या आंदोलनामुळे नरेंद्र मोदी सत्तेत आलं असल्याचं ते म्हणाले.कृतघ्न माणसांसाठी कुठे जीवाची बाजी लावता अण्णा फार ताणू नका असा सल्ला राज ठाकरे यांनी हजारे यांना दिला.