गडकरींच्या नावाची पंतप्रधानपदासाठी चर्चा; वाचा काय वाटतं राज ठाकरेंना ?

टीम महाराष्ट्र देशा- ‘गडकरींच्या नावाची पंतप्रधानपदासाठी चर्चा करणारे बहुधा त्यांचे शत्रू असावेत, असं सूचक वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याबदद्ल आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत याबद्दल विचारलं असता ठाकरे यांनी हे मत व्यक्त केलं आहे.

राज यांनी यावेळी महाराष्ट्रासह देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. ‘शिवसेना-भाजपच्या सभांना होणारी गर्दी आटली आहे. लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडत चालल्याचंच हे द्योतक आहे, असं सांगतानाच, ‘सेना-भाजपवाले काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा बेकार निघाले,’ असं ते म्हणाले.