मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेला गळतीचे जणू ग्रहणच लागल्याचे दिसून येत आहे. अशातच कालपर्यंत शिवसेनेत असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) नॉट रिचेबल दाखवत आहेत. त्यांचा फोन लागत नसल्याने इतर आमदारांप्रमाणे भास्कर जाधवही ‘शिंदे’ सेनेत सहभागी तर नाही झाले ना? अशा चर्चा आता रंगत आहेत. अशातच या बंडापूर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.
देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्व गोष्टी ठरल्यानंतर अमित शहा यांच्याशी बोलणी केली. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर या बंडाला सुरुवात झाल्याचे कळते. गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. पण राष्ट्रवादीच्या आमदारांनी पाठिंबा देण्यास नकार दिल्याने हा प्रयत्न फसला होता. आता मात्र या बंडापूर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.
दरम्यान या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. “महाविकास आघाडीने अडीच वर्षे उत्तम कारभार केला. अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोनासारखे राष्ट्रीय संकट असताना आरोग्य खात्याने अतिशय चांगले काम केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरला नाही, असे कोणी म्हणत असेल तर ते राजकीय अज्ञान आहे. प्रसिद्धी माध्यमांमधून ज्या गोष्टी पुढे येत आहेत, त्या नाकारता येणार नाहीत. पण विधानसभेचे जे सभासद महाराष्ट्राबाहेर गेले, ते पुन्हा राज्यात आल्यानंतर ज्या प्रकारे त्यांना नेले ही वस्तुस्थिती लोकांना सांगतील व ते पुन्हा शिवसेनेसोबत राहतील. त्यानंतर बहुमत कुणाचे आहे, ते सिद्ध होईल.” असे शरद पवारांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या –