सहिष्णुता हीच भारताची ओळख : प्रणव मुखर्जी

नागपूर : राष्ट्रवाद कोणत्याही एका जात, धर्म, भाषा यांच्या अधीन नाही. सहिष्णुता हीच भारताची ओळख असून भेदभाव, तिरस्कार करत राहिल्यास जगात भारताची प्रतिमा बिघडेल असा इशारा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपुरात बोलताना दिला आहे. प्रणव मुखर्जी यांनी नागपूर येथे स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं. तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाचा आज समारोप समारंभ होता. यावेळी बोलताना नेहरूंचे उदाहरण देत मुखर्जी यांनी भारताच्या वैविध्य्तेचा गौरव देखील केला.

तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाला संघात अतिशय महत्त्व असतं. नागपुरात 14 मे पासून वर्गाला सुरुवात झाली. या वर्गात देशभरातून 800 तरुण स्वयंसेवक सहभागी झाले होते.

प्रणव मुखर्जी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

 • राष्ट्रवाद आणि देशभक्ती यावर बोलण्यासाठी आलो आहे.
 • भारत स्वतंत्र विचारांचा देश,देशासाठी समर्पण हीच देशसेवा.
 • १८०० वर्षांपूर्वी भारत शिक्षणाचे केंद्र होते. भारतातून जगभरात बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार
 • आम्ही जर भेदभाव ,तिरस्कार केला तर आपल्या देशाची ओळख धोक्यात येईल.
 • भारतातील विविध वर्ण, धर्म, भाषा हीच खरी ओळख, सात धर्म, 122 भाषा, 1600 बोली… हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन अशा सर्वांनी मिळून भारताची खरी ओळख

तत्पूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं. संघ नेहमीच समाजातील सदगृहस्थाना बोलवत असतो. प्रणव मुखर्जी याना आम्ही निमंत्रण दिलं यावर वाद घालणे तसेच संघाने मुखार्जीना का बोलावलं हा प्रश्न निरर्थक आहे असं म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. डॉ.हेगडेवार हे कॉंग्रेसच्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होते तसेच हेगडेवार यांनी दोन वेळा कारावास भोगला असा दावा देखील भागवत यांनी केला.

मोहन भागवत यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

 • डॉ.हेगडेवार हे कॉंग्रेसच्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होते तसेच हेगडेवार यांनी दोन वेळा कारावास भोगला असा दावा देखील भागवत यांनी केला.
 • केवळ हिंदूच नाही, सर्व समाजाला संघटित करण्याचं संघाचं काम, भारतात जन्मलेला प्रत्येक जण भारताचा सुपुत्र .
 • संघाच्या परंपरेला अनुसरुनच प्रणव मुखर्जींसारख्या सदगृहस्थांना निमंत्रण, देशभरातील चर्चा निरर्थक.
 • संघ फक्त हिंदूंसाठी नसून सर्व समाजासाठी आहे.
 • सरकार खूप काही करू शकत मात्र सरकार सर्वकाही करू शकत नाही.
 • हेगडेवार यांनी दोन वेळा कारावास भोगला.
 • आम्ही कुणाचाही विरोध करत नाही. ज्याना संघ जाणून घ्यायचा असेल त्यांनी यावं आम्ही स्वागत करू.

दरम्यान, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपुरातील रेशीम बाग या ठिकाणी असलेल्या स्मृती मंदिराला भेट दिली. या ठिकाणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांचे स्वागत केले.प्रणव मुखर्जींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या परिवाराला जोरदार झटका दिला. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांना अभिवादन केलं. हेडगेवार हे भारतमातेचे सुपुत्र आहेत आहेत अशी प्रशंसा प्रणव मुखर्जी यांनी केल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. स्मृती मंदिर या ठिकाणी असलेल्या नोंदवहीत त्यांनी ही नोंद केली. अवघ्या देशाचे लक्ष आज प्रणव मुखर्जी काय बोलणार याकडे लागले होते.

काँग्रेसच्या विचारधारेला मानणारे प्रणव मुखर्जी उद्या होणाऱ्या कार्यक्रमात काय बोलणार ? कोणती भूमिका मांडणार ? याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. कारण काँग्रेस आणि आरएसएस यांच्या विचारधारेत कमालीचे अंतर असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आपल्या प्रत्येक भाषणातून आरएसएसवर सडकून टीका करत असतात. त्यामुळे मुखर्जी उद्या काय बोलणार ? याकडे राजकीय तज्ञ, पत्रकारांचेच नव्हे तर सर्वसामान्यांचेही लक्ष लागलं होत.