सोशल डीस्टांसिंगमध्ये अजब पर्याय शोधला; आनंद मिहिंद्रांनी सुनावले

आनंद महिंद्रां

मुंबई: राज्यातील कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने केलेली नियमावली, उपाययोजना यांची वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवितानाच माध्यमांनी जनजागृती करावी. साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

विविध माध्यमांमध्ये आरोग्य विषयक पत्रकारिता करणाऱ्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी दृरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. मात्र तरी देखील काही लोक अद्याप देखील नियमांच पालन करत नसल्याचं दिसून येत आहे.

यावर आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर एक खास ट्विट केले असून त्यांनी यावेळी असे नियमांच पालन न करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. त्यांनी सोशल डिस्टेंसिंगसाठी संदेश देणारा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये एक माणूस एका काउंटरवर उभा असल्याचे पाहता येईल. ज्यामध्ये ग्राहक आणि अधिकारी यांच्यात काचेचा अडथळा आहे. काउंटरच्या दुसर्‍या बाजूला उभी असलेली व्यक्ती केबिनच्या आत बसलेल्या अधिकाऱ्याशी बोलण्यासाठी कट-आऊट छिद्रातून डोकं आत टाकताना दिसून येत आहे. जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

आनंद महिंद्रांनी ट्विटरवर कॅप्शनसह हा फोटो शेअर केला आहे, त्यासह त्याने लिहिले आहे की, ‘स्पष्टपणे, आम्ही सोशल डिस्टेंसिंगची काळजी घेत नाही. पण आता विचार करण्याची आणि मुखवटा बदलण्याची वेळ आली आहे.’ असा सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे. आनंद महिंद्रांनी आपल्या फॉलोअर्सना ‘मास्क घाला’ असे सांगत आवाहन केलं आहे. आनंद महिंद्रा यांचे ट्विट त्वरित व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :