राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या महिल्या नेत्यावर शिस्तभंगाची कारवाई

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पैठण तालुकाध्यक्ष अनिता वानखेडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अनिता वानखेडे यांच्यावर कारवाई करत त्यांची सहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच पक्षाच्या चिन्हाचा आणि पदाचा गैरवापर करू नये अशी ताकीदही त्यांनी यावेळी दिली आहे.

मात्र वानखेडे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. या संबंधी त्यांनी आपल्या फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ”पदाचा गैरवापर झाला या आशयाचे पत्र सोशल मिडीयावर गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल होत आहे. मात्र मला याची कोणतीही पूर्वसूचना न देता माझे सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात रुपाली चाकणकर आणि हेमंत टकले यांनी माझ्यावर केले आरोप सिध्द करावेत, अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

Loading...

तसेच जर रुपाली चाकणकर आणि हेमंत टाकले यांनी हे आरोप सिध्द केले नाहीत तर पक्ष कार्यालयाच्या बाहेर उपोषण करणार आहे. जर माझे काही बरेवाईट झाले तर त्याला सर्वस्वी चाकणकर आणि टकले हेच राहतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. दरम्यान वानखेडे यांनी यावेळी बोलताना सांगितले कि, औरंगाबादमध्ये मी एकमेव राष्ट्रवादीची पैठण तालुक्यातील महिलाध्यक्षा म्हणून काम करत आहे. मात्र तरीही या दोन्ही जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदारांकडून खच्चीकरण केले जात असल्याचा आरोही वानखेडे यांनी यावेळी केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या दोन्हीही जिल्ह्यात कामे केली . मात्र विधानसभा निवडणुकीत आपल्याया एकही जागा मिळवता आली नाही,पक्षातील आमदारांना कंटाळून आज ४५ पेक्षा जास्त लोक पक्ष सोडून गेले. याला कारणीभूत कोण आहे, याचही चिंतन करणे गरजेचे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
गावितांची 'हीना' होणार 'वळवींची' सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन