fbpx

स्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना आज एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. स्वाईन फ्लू झाल्याने त्यांना बुधवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वाईन फ्लू झाल्याची माहिती खुद्द अमित शाह यांनी ट्विट करुन दिली होती. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले होते की, मला स्वाईन फ्लू झाला असून त्यावर उपचार चालू आहे. परमेश्वराची कृपा, तुमच्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वादामुळे लवकरच बरा होईन.

भाजपाचे नेते खासदार अनिल बलुनी यांनी यासंदर्भातील माहिती ट्विट करून दिली आहे. ते याबात म्हणाले, ‘आपणा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रकृती पूर्णतः सुधारली आहे. एम्स’मधून डिस्चार्ज घेऊन ते आपल्या निवासस्थानी परतले आहेत. बलुनी यांनी पार्टीचे कार्यकर्ते आणि शहा यांच्या शुभचिंतकांचे आभारदेखील व्यक्त केले आहेत.

1 Comment

Click here to post a comment