सोलापुरात मोहिते पाटील लागले कामाला, जिल्हा परिषदेत संजयमामा विरोधात अविश्वास ठराव ?

vijaysinh mohite & sanjay shinde

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर भाजपमध्ये प्रवेश केलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकीय वजन वाढवण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणत त्यांची कोंडी करण्याची खेळी केली जात आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Loading...

जिल्हा परिषद निवडणुकीत संख्याबळ असताना संजय शिंदे यांच्या बंडामुळे मोहिते पाटलांना सत्तेतून बाहेर रहाव लागलं होत, आता लोकसभा निवडणुकीत झालेल्या उलथापालथीमुळे सोलापूर जिह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे, भाजपची साथ घेत जि प अध्यक्ष झालेले संजय शिंदे राष्ट्रवादीमध्ये तर रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये दाखल झाले आहेत. शिंदे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ सोडल्याने दुखावले गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा पराभव करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत.

दरम्यान, लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वीच शिंदे यांना अध्यक्षपदावरून पायउतार करण्यासाठी राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. आज पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत समविचारी नेत्यांची बैठक घेण्यात आली आहे, या बैठकीला माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत संजय शिंदे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्याची चर्चा झाल्याचं कळतय.

सोलापूर जिल्हा परिषद पक्षीय बलाबल

 • राष्ट्रवादी – २३
 • काँग्रेस – ७
 • दीपक साळुंखे व गणपतराव देशमुख – ५
 • भाजप – १४
 • शिवसेना – ५
 • परिचारक गट – ३
 • शहाजीबापू पाटील गट – २
 • महाडिक गट – ३
 • समाधान आवताडे गट – ३
 • संजय शिंदे गट – २
 • सिद्रामप्पा पाटील गट- १
Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही