Education board- पुणे महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त

pmc

पुणे: गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या घोटाळ्यांचे आरोप असलेले पुणे महापालिकेचे शिक्षण मंडळ अखेर आज महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बरखास्त केले आहे . सध्या अस्तित्वात असलेल्या शिक्षण मंडळाची मुदत 14 मार्च 2017 रोजी संपुष्टात आली होती . त्यामुळे सध्याचे शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचा अभिप्राय विभागाने दिला होता. मात्र, यात प्रशासनाकडून दिरंगाई होत होती.  अखेर शिक्षण मंडळ बरखास्तीचा आयुक्त कुणाल कुमार यांनी निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 2013 मध्ये पारित केलेल्या अध्यादेशानुसार शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचे निर्देश दिले देण्यात आले होते . त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे पुणे महापालिकेच्या 287 प्राथमिक आणि 30 माध्यमिक शाळा एकत्रित करण्यात येणार असून यापुढे पुणे महापालिकेचा शिक्षण विभाग म्हणून संबोधले जाणार आहे. यापुढे अतिरिक्त आयुक्तांकडे या विभागाची जबादारी असणार असून खाते प्रमुख म्हणून माध्यमिक विभागासाठी शिक्षण अधिकारी कामकाज पाहतील.