‘निराशाजनक शेवट, पण…’; कर्णधार कोहलीने खेळाडू तसेच चाहत्यांना लिहिला खास संदेश

virat

अबुधाबी : आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला चार विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले. सोमवारी झालेल्या एलिमिनेटर मॅचमध्ये शारजाह मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात केकेराने आरसीबीवर मात करत विजय मिळवला आणि आरसीबी या पराभवासह आयपीएल मधून बाहेर पडली.

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करताना आरसीबीचे फलंदाज सुनील नरेनच्या गोलंदाजीसमोर असहाय दिसला आणि 20 षटकांत 7 गडी बाद 138 धावा केल्या आणि केकेआरला विजयासाठी 139 धावांचे लक्ष्य मिळाले.केकेआरने 19.4 षटकांत 6 विकेटवर 139 धावा करत विजयाचे लक्ष्य गाठले आणि सामना चार गडी राखून जिंकला. या विजयासह, केकेआरने पात्रता 2 मध्ये स्थान मिळवले, तर आरसीबीचा प्रवास या पराभवाने संपला.

पराभवानंतर विराट संघाचे नेतृत्व करणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. सामन्यानंतर विराट कोहलीने आपल्या भावनाही व्यक्त केल्या. या पराभवाच्या काही तासांनंतर विराटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांसह RCB खेळाडूंसाठी एक खास संदेश लिहिला. यावेळी विराटने लिहिले, ‘आम्हाला पाहिजे तो निकाल मिळाला नाही पण संपूर्ण स्पर्धेत साथीदारांनी दाखवलेल्या खेळीचा अभिमान आहे. निराशाजनक शेवट पण आपण आपले डोके उंच ठेवू शकतो. आपल्या निरंतर समर्थनासाठी सर्व चाहते, व्यवस्थापन आणि सहाय्यक कर्मचारी यांचे आभार

महत्वाच्या बातम्या