वाद सुरूच….इंदुरीकर महाराजांच्या मुद्यावरून राष्ट्रवादीत मतभिन्नता ?

पुणे : कीर्तनकार निवृत्ती देशमुख (इंदोरीकर) यांनी “सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असे विधान ओझर येथे झालेल्या किर्तनात त्यांनी केलं. त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेतल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी मंगळवारी नगरमध्ये आल्यानंतर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन इंदुरीकर महाराजांविरोधात लेखी तक्रार दिली आहे.दरम्यान, वाद वाढत असल्याने अखेर इंदुरीकर महाराजांनी जाहीर दिलगिरी व्यक्त करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Loading...

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील मतभिन्नता आहे का असा सवाल आहे. कारण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मिडीयाला दिलेल्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या आहेत. आमदार रोहित पवार यांनी देखील इंदोरीकर महाराजांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाष्य केलं आहे. याबाबत ते उस्मानाबाद येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘इंदोरीकर महाराजांची कीर्तन करण्याची पद्धत सोपी असते. व्यसन मुक्ती सारखे काम ते करतात. याच बरोबर ते असे बोलले आहे का ? त्यांचा हेतू काय होता हे तपासले पाहिजे,’ असे रोहित पवार म्हणाले.दरम्यान, ‘इंदोरीकर महाराज यांनी लेखी माफी मागितली आहे. त्यामुळे खोलात जाण्याची गरज नाही. भाजपचे लोक जसं एखादं वाक्य मुद्दाम बोलतात तसं महाराज बोलत नाहीत, असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपला टोला लगावत महाराजांची अप्रत्यक्षपणे बाजू घेतली आहे.

तर दुसऱ्या बाजूला खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदुरीकर महाराज यांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.सुप्रिया सुळे यांनी इंदुरीकर महाराजांचं वक्तव्य दुर्देवी असल्याचं म्हणत खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशाप्रकराची अंधश्रद्धा पसरवली जाणं हे दुर्दैवी आहे. किर्तनकारांबद्दल माझ्या मनात मान सन्मानच आहे. माझी श्रद्धा आहे. पण अंधश्रद्धा नाही. यशवंतराव चव्हाणांच्या, दाभोळकरांच्या संस्कारात आम्ही वाढलो आहोत. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणे दुर्दैवी आहे.’

दरम्यान, राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ‘महाराष्ट्र देशा’ शी बोलताना इंदुरीकरांच्या या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोणताही कीर्तनकार, प्रबोधनकर आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला एक दिशा देत असतो. मात्र इंदुरीकर महाराज आपल्या प्रबोधनातून महिला मुलींवर उपहासात्मक आणि अपमानास्पद टीका करत असतात. आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे. यापरंपरेतून त्यांनी चांगले विचार समाजात रुजवायला पाहिजेत. मात्र प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी संतांचा विचार मांडला पाहिजे.’

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांना प्रसिद्धी मिळत असल्याने त्यांना आता भान राहिलेले नाही. ते आपल्या प्रत्येक भाषणात महिलांविरोधात बोलत असतात. त्यामुळे अशा महाराजाविरोधात गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्यास आम्ही अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करत सरकारला जाब विचारू, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी घेतली. तसेच यासंबंधी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रारही केली.

राष्ट्रवादीचे अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनीही निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना पाठींबा देत साथ दिली आहे. डॉ. लहामटे ट्वीटर वर प्रतिक्रिया देताना म्हणतात,’महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका. आपल्या समाजात काही विकृत लोक असतात जे आपल्याला आतुन संपवण्याचा प्रयत्न करतात. आपण खूप हळवे आहात, त्यामुळे खचून जाऊ नका आपल्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे.’

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती