राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्बयाद्दल विनायक आंबेकर या भाजपशी संबंधित असलेल्या व्यक्तीने गलिच्छ पोस्ट केली होती, असा दावा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुहास उभे यांनी केला आहे. पुण्यातल्या शुक्रवार पेठेत राहणाऱ्या विनायक आंबेकर यांना त्यांच्या कार्यालयात घुसून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बेदम चोप दिला आहे. आंबेकर यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आले आहे.
तसेच इथून पुढे जो कोणी शरद पवारांबद्दल गलिच्छ पोस्ट करेल, त्याला अशीच वागणूक दिली जाईल, असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.