VIDEO: पंतप्रधानांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अश्लील घोषणाबाजी

शरद पवार यांच्या विचारांना कार्यकर्त्यांकडून तिलांजली

औरंगाबाद/श्याम पाटील  – एकीकडे सोशल मिडीयावर सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं म्हणून राष्ट्रवादीकडून गुन्हा दाखल केला जातो तसेच सुप्रिया सुळे शाळकरी मुलींना पंतप्रधानांचा उल्लेख एकेरी करू नये असे धडे देतात मात्र हेच धडे सुप्रिया ताईंनी आपल्या कार्यकर्त्यांना का दिले नाहीत ? असं विचारण्याची वेळ आली आहे कारण आज औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आयोजित केलेल्या हल्लाबोल आंदोलनात मोदींच्या विरोधात घोषणा देताना पातळी सोडल्याच लाजिरवाणे चित्र पहायला मिळालं.

विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून राज्यभर हल्लाबोल आंदोलन केलं जात आहे. आज औरंगाबादमध्ये जे हल्लाबोल आंदोलन आयोजित करण्यात आले होते त्यात अतिशय अश्लील भाषेत देशाचे पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.दुसऱ्या पक्षातील नेत्यांचा आदर करा कोणावरही टिका करताना पातळी सोडू नका या शरद पवार यांच्या विचारांना त्यांच्याच कार्यकर्त्यांनी तिलांजली दिल्याचे आज पहायला मिळाले.

पहा काय घोषणा दिल्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी

You might also like
Comments
Loading...