दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचा शेवटचा ‘दिठी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

सुमित्रा भावे

मुंबई : मनोरंजन क्षेत्रातील काही कलाकरांनी अभिनय, गायन, संगीत आणि दिग्दर्शन क्षेत्रात आपल्या कार्याच्या जोरावर  स्वत: च असं भक्कम  स्थान निर्माण केल आहे. यातील लेखिका-दिग्दर्शिका क्षेत्रातील सुमित्रा भावे यांचे नाव पुढे येते. काही दिवसांपूर्वीच त्यांचे निधन झाले. सुमित्रा भावे यांची शेवटचा चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. सुमित्रा भावे फिल्म्स प्रस्तुत आणि डॉ. मोहन आगाशे निर्मित ‘दिठी’ हा चित्रपट सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.

समीक्षकांची कौतुकाची थाप मिळालेल्या ‘दिठी’ या चित्रपटात एका लोहाराची कथा आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे त्याला झालेल्या वेदना, त्याचे दुःख आणि अद्वैतवादाचा सिद्धांत अनुभवण्याच्या त्याच्या प्रवासाची ही गोष्ट आहे. ‘दिठी’च्या निमित्तानं प्रथमच किशोर कदम यांना वारकऱ्याची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली ‘दिठी’ मध्ये मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, किशोर कदम, अमृता सुभाष, शशांक शेंडे आदी दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. २१ मे पासून हा चित्रपट सोनी लिव्हवर पाहता येणार आहे.

डीओपी धनंजय कुलकर्णी यांनी या सिनेमाची फार सुरेख सिनेमॅटोग्राफी केली आहे. अतिशय कमी रिसोर्सेस वापरून, कमी लाईट वापरून इतकी उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी त्यांनी केली आहे. सर्वच कलाकारांनी आपापाल्या नावारूपाला साजेसा अभिनय करत प्रत्येक व्यक्तिरेखेत जीव ओतला आहे. यामध्ये पार्थ उमराणीनी यांनी संगीत दिलं असून, पार्श्वसंगीत साकेत कानेटकरचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP