दिग्दर्शक सुबोध भावे घेऊन येत आहे ‘पुष्पक विमान’

टीम महाराष्ट्र देशा- सुबोध भावे हे  मराठी सिनेमा सृष्टीतील आघाडीचे नाव. वेगवेगळ्या भूमिकाना न्याय देत त्यांनी दिग्दर्शनात पाऊल टाकल आणि तिथेही त्यांनी आपली छाप अगदी यशस्वीरित्या पाडली. ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमातून ते अभिनय आणि दिग्दर्शन हि दोन्ही जबाबदारी ते पेलताना दिसले. हा सिनेमा मराठी प्रेक्षकांनी चांगलाच डोक्यावर घेतला. मराठी सिनेमाकडे पाठ फिरवणारा प्रेक्षक या सिनेमामुळे आपोआप त्याचे पाय परत सिनेमागृहाकडे वळायला लागले.

आता पुन्हा एकदा आपल्या भेटीला येता आहेत ते आपल्या नवीन कोऱ्या सिनेमाच्या माध्यमातून. नुकतच त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या नवीन सिनेमाच पोस्टर लौंच केलं. सुबोध भावे दिग्दर्शित नवीन कन्सेप्ट असणारा चित्रपट ‘पुष्पक विमान’ आपल्या भेटीला येतोय. या चित्रपटातून कोणते-कोणते कलाकार भेटीला येणार आहेत यावर अजून गुलदस्त्यात आहे. पुष्पक विमानाचे उड्डाण ३ ऑगस्ट रोजी होणार असल्याच पोस्टरच्या माध्यमातुन समजते आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध आणि वैभव चिंचाळकर यांनी केल आहे. वैभव चिंचाळकर यांनी १९९३ मध्ये मराठी रंगभूमीवर अभिनेता म्हणून आपले कॅरियर सुरु केल पण त्यांची ओढ दिग्दर्शनाकडे असल्याने त्यांनी असिस्टंट डिरेक्टर म्हणून कामाला सुरवात केली. ‘श्री गंगाधर टिपरे’ सर्वात पहिली मालिका होती. त्यानंतर झी मराठी वरील ‘कुलवधु’ हि त्यांची दिग्दर्शक म्हणून पहिली मालिका यशस्वी ठरली आणि त्यांनी नंतर वळून बघितलच नाही. ‘पुढच पाऊल’ हि देखील टीआरपीच्या रेसमध्ये अग्रेसर असणारी मालिका होती. वैभव यांनी ‘दुनियादारी’ या चित्रपटासाठी सवांदलेखन करून आपली अजून एक कला प्रेक्षकांसमोर आणली आणि ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

वाढदिवस विशेष : सई ताम्हणकर- मराठीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री