विनोद तावडे एक काम करो ‘कुर्सी छोडकर डान्स करो’

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी

 

औरंगाबाद-   डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २०१२ मध्ये झालेल्या पदभरतीत अपहार, भ्रष्टाचार केल्याप्रकरणी संचालक डॉ. धनराज माने यांची हकालपट्टी करण्याची मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने बुधवारी उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयासमारे निदर्शने करण्यात आली.

विनोद तावडे एक काम करो कुर्सी छोडकर डान्स करो, विनोद तावडे हमको पढने दो, देशको आगे बढने दो,. ‘विनोद की ‘धनराज’ के साथ जुगलबंदी’, ‘धनराज माने खुर्ची खाली करा’अशा घोषणा देत भाजपची विद्यार्थी आघाडी असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांच्या हकालपट्टीचीही मागणी परिषदेने केली.

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे हेच डॉ. माने यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही अभाविप कडून करण्यात आला.तसेच या प्रकरणी शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणीही कार्यकर्त्यांनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २०१२ मध्ये झालेल्या पदभरतीत अपहार, भ्रष्टाचार केल्याप्रकरणी संचालक डॉ. माने यांना एप्रिल मध्ये निलंबित केल्याची घोषणा तावडे यांनी विधानसभेत केली होती. मात्र, ही घोषणा हा हवेतच विरली .घोषणा होऊनदेखील  माने यांचं निलंबन झालं नाही याचा निषेध करत अभाविपने हे आंदोलन केले. यावेळी राज्यातील विविध सहसंचालक कार्यालयांसमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

आंदोलकांनी सहसंचालक डॉ. राजेंद्र धामणस्कर यांना निवेदन दिले. या वेळी प्रदेशमंत्री राम सातपुते, महानगर सहमंत्री निखिल आठवले, शिवा देखणे, विवेक पवार, गजानन वाबळे, योगेश पवार, ईश्वर अष्टेकर, वैभव थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

You might also like
Comments
Loading...