राज ठाकरेंचे निकटवर्तीय महेश मांजरेकर ‘कॉंग्रेस’च्या वाटेवर ?

मुंबई: सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याच बोलल जात आहे. महेश मांजरेकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात, २०१४ मध्ये त्यांनी मनसेच्या तिकिटावर उत्तर-पश्चिम मुंबईमधून निवडणूक लढवली होती. याबद्दलचे वृत्त abp माझाने दिले आहे.

हिंदी आणि मराठी चित्रपटातून महेश मांजरेकर हे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेले नाव आहे. राजकीय आखड्यातही त्यांनी २०१४ मध्ये आपले नशीब आजमावून पाहिले होते. यावेळी त्यांनी मनसेच्या तिकिटावर गुरुदास कामत यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मांजरेकर हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचेही जवळचे मित्र आहेत

You might also like
Comments
Loading...