अतिवृष्टीग्रस्त भागात पंचनामे करण्यापेक्षा थेट आर्थिक मदत करा – मनीषा मुंढे

औरंगाबाद : मनपा आयुक्तालयासमोर अतिवृष्टी झालेल्या भागात पंचनामे न करता थेट आर्थिक मदत करण्याची मागणी भाजप महिला मोर्चा शहर सचिव मनीषा मुंढे यांनी केली. सुरुवातीला मनपाच्या मुख्यदरवाज्या समोर त्यांच्यासह महिलांनी ठिय्या आंदोलन केले त्यानंतर त्यांनी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांना निवेदन दिले.

शहरात मागील दोन दिवसापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे अतिवृष्टीने बाधित झालेल्या घरांचे तात्काळ पंचनामे करू नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, परतीच्या मान्सूनने मागील दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शहरातील सखल भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. महानगरपालिका प्रशासक आपण प्रत्यक्षस्थळ पाहणी करून भेट द्यावी व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या घराचे/भागांचे पंचनामे करत बसण्यापेक्षा तात्काळ मदत द्यावी.

अतिवृष्टी झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. तसेच काही ठिकाणी ओढे/नाल्यांचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने अनेक ठिका मार्गावरील वाहतूक सुद्धा ठप्प झाली तर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता, एक परतीच्या मान्सूनने हाहाकार उडवला असल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शहरात अनेक संकटे ओढवलेली आहेत.

मागील दोन दिवसापासून होत असलेल्या पावसाने थैमान घातले असून यामुळे ठेकाणी ओढे/नाल्यांचे पाणी घरात घुसल्याने नागरिक अस्थिर झाले आहेत, याबाबत मनपा प्रशासक यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे करण्यापेक्षा तातडीने आर्थिक करावी असे निवेदनात म्हंटले आहे. यावेळी सविता मिसळ, मीरा पठाडे, अनिता तुपे, कमल साठे यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या