अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ

rani padmavati 2

मुंबई  : संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटावर आक्षेप घेत करणी सेनेने दिलेल्या धमकीमुळे मुंबई पोलिसांनी दीपिका पादुकोणच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. पद्मावती प्रदर्शित झाला तर अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नाक कापून टाकू, अशी धमकी राजपूत करणी सेनेने दिली आहे.

राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र नाथ यांनी काल ( 16 नोव्हेंबर ) लखनऊ येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. पद्मावती हा सिनेमा हिंदूंच्या भावना दुखावणारा आहे. त्यासाठी भन्साळींना दुबईतून पैसा मिळाला आहे. दाऊद इब्राहीमने त्यांना दुबईमार्गे पैसा पुरवला आहे.

पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.