दीपक साळुंखे पाटील म्हणतात ‘तो मी नव्हेच’

टीम महाराष्ट्र देशा– अक्कलकोट महिला पदाधिकार्यांबाबत शिवराळ भाषा वापरल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली असून त्यातील आवाज आपला नाही. हे तर आपल्याला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी लिगल सेलचे अध्यक्ष लवकरच पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. कायदेशीर सल्ला घेवून पुढील कारवाई करणार असल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केला.

मोतीराम चव्हाण आणि दीपक आबा यांच्यातील मोबाईल संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून या क्लिपमध्ये दीपकआबा अक्कलकोट महिला तालुका अध्यक्षांविषयी शिवराळ भाषेत बोलत असल्याचे ऐकायला येते.

Loading...

नेमकं काय म्हटलं आहे या क्लिप मध्ये ?

“शरद पवार आहेत तो पर्यत माझं कोणी सुद्धा वाकडं करू शकत नाहीत. त्या ‘बाई’ला ****आला असेल तर दे म्हणावं राजीनामा, **** कार्यकर्त्यांना मी भीक घालत नाही. कोणत्या **** राजीनामा द्यायचा आहे त्यांनी खुशाल द्यावा. मोहिते पाटलांचे चमचे, **** लोकांनी आपल्याला पक्ष निष्ठा शिकवू नये”… अशा प्रकारचे बेताल आणि शिवराळ संभाषण या ऑडियो क्लिपमध्ये आहे. त्यामुळे पक्षाच्या महिला व इतर पदाधिकाऱ्याबाबत अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या साळुंखे पाटलावर पक्षांचे ज्येष्ठ नेते काय कारवाई करतात, की त्यांना पाठीशी घालतात याकडे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

मल्हारराव होळकरांविषयी हीन दर्जाचे लिखाण ; ‘जोडेमार’ आंदोलनाद्वारे जितेंद्र आव्हाडांचा निषेध

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील