सरपंच सोडा राणे स्वतःचा मुलाला निवडून आणू शकत नाही – दीपक केसरकर

मुंबई : नारायण राणे यांनी कोकणात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपलेच वर्चस्व असल्याचा झेंडा मिरवला होता. नव्याने स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने नुकत्याच झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकींत निर्विवाद वर्चस्व असल्याचा दावा केला होता. पण हा दावा फोल असल्याचा आरोप गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.

“नारायण राणे यांच्यात सरपंच सोडा स्वतःच्या मुलाला सुधा निवडणूक आणण्याची ताकद नाही असा टोला केसरकर यांनी लावला आहे. राणेंचं चारित्र्य मला माहिती आहे, मी अद्याप सोज्वळता सोडली नाही म्हणून बोलत नाही. राणेंच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत” अशी टीका देखील दीपक केसरकर यांनी केली.

1 Comment

Click here to post a comment