नावाप्रमाणे राणेंनी स्वाभिमान दाखवत खासदारकीचा राजीनामा द्यावा : दीपक केसरकर

टीम महाराष्ट्र देशा : भाजप कडून खासदारकी मिळवायची आणि भाजप विरोधातच काम करायचे. यापेक्षा आपल्या पक्षाच्या नावाप्रमाणे राणेंनी स्वाभिमान दाखवत खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग मैदानात उतरावे. असे म्हणत राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांना टोला लगावला. युतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मालवण तालुक्यातील हिवाळे जिप मतदार संघातील श्रावण येथे आयोजित प्रचार सभेत मंत्री केसरकर बोलत होते. यावेळी केसरकरांनी नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी देखील कॉंग्रेसचा राजीनामा द्यावा असे आव्हान दिले.

केसरकर पुढे म्हणाले की, एवढे दिवस गप्प होतो ते तुम्हाला घाबरून नव्हे. तर जनतेची कामे करत विकास निधी आणत होतो. आता मैदानात उतरत तुमचे खरे स्वरूप जनतेसमोर आणणार, असे सांगत केसरकरांनी राणेंना चांगलेच झोडपून काढले. तसेच सर्वांगीण विकासाचा ध्यास असलेले खासदार विनायक राऊत याहीवेळी मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. असा विश्वास मंत्री केसरकर यांनी व्यक्त केला. तर खासदार राऊत यांच्या विजयानंतर त्यांना मंत्रिपद मिळावे ही मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जनतेच्या वतीने करू, असेही ते म्हणले.

दरम्यान रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून युतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांची वर्णी लागली आहे तर त्यांना टक्कर देण्यसाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा कडून निलेश राणे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मध्ये विनायक राऊत आणि निलेश राणे अशी रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे.