डेक्कन क्वीन एक्स्प्रेसची नवी ‘डायनिंग कार’ लवकरच

पुणे : पुणे टु मुंबई प्रवास करणाऱ्या लाखो प्रवासी लोकांच्या जिव्हाळ्याच विषय असलेल्या पुणे-मुंबईदरम्यान धावणार्‍या प्रतिष्ठित डेक्कन क्वीन एक्स्प्रेसची नवी डायनिंग कार लवकरच प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही अद्ययावत डायनिंग कार डेक्कन क्वीनला जोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. सध्या मुंबईतील माटुंगा यार्डात डायनिंग कारच्या नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
सध्याची पॅन्ट्री कार काही दिवसांतच काढून टाकण्यात येणार असून, त्या जागी ही नवी डायनिंग कार जोडली जाणार आहे. ती अंतर्बाह्य आकर्षक करण्यात येणार असून, त्यातील आसनक्षमता वाढविण्यात येणार आहे. खुर्च्या, टेबलसह अन्य फर्निचर अधिक आकर्षक करण्यात येणार आहे. डायनिंग कारमधील क्रॉकरीही बदलण्यात येणार आहे. त्याचबरोबर पडदे देखील नवे लावण्यात येणार आहेत.
स्वयंपाक-घरदेखील प्रशस्त करण्यात येणार आहे. एखाद्या हॉटेलसारखी त्याची रचना असणार असून, डायनिंग कारमधील काही पदार्थही वाढविण्यात येऊ शकतात, अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, डिसेंबर २०१४ मध्ये डेक्कन क्वीनची पॅन्ट्री कार कोणतेही कारण न देता अचानक काढून टाकण्यात आली होती. त्यावेळी प्रवाशांनी पॅन्ट्री कार पुन्हा एकदा जोडावी याकरिता सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर १ जून २0१५ रोजी डेक्कन क्वीनला पुन्हा एकदा पॅन्ट्री कार जोडण्यात आली.


१ जून १९३० साली सुरु झालेली डेक्कन क्वीन ही देशातील पहिली डायनिंग कार आईएसओ मानांकित रेल्वे आहे. तसेच नवीन डायनिंग कारमधे जास्ती आसनबअसलेली व्यवस्था आहे. खिडक्यांना पडदे, नवीन टेबल व अधिक उतकृष्ट व रुचकर अस जेवन व्यवस्था आहे. तसेच किचन मधे सोलर सिस्टीम देखील आहे. अशी ही नाविन्यपूर्ण डाइनिंग कार ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल.

– हर्षा शहा, अध्यक्षा (रेल्वे प्रवासी ग्रुप)