fbpx

खेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग विजेता

पुणे : मुलांच्या २१ वषार्खालील गटात दिनेश सिंग याने दहा हजार मीटर्सचे अंतर ३१ मिनिटे ५८.१६ सेकंदात पार करीत विजेतेपदावर नाव कोरले. त्याने सुरेख धाव घेत ही शर्यत जिंकली. मूळचा तो उत्तरप्रदेशचा खेळाडू आहे.

दोन वषार्पासून तो नाशिक येथे विजेंदरसिंग यांच्या अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. या अकादमीत प्रवेश घेतल्यानंतर आपल्या कामगिरीत सुधारणा झाली आहे असे दिनेश सिंग याने सांगितले. येथील शर्यतीत उत्तरप्रदेशचा कार्तिक कुमार याने ही शर्यत ३२ मिनिटे १५.४५ सेकंदात पार करीत रौप्यपदक पटकाविले. गुजरातच्या विशाल मकवाना याला ब्राँझपदक मिळाले. त्याने हे अंतर ३२ मिनिटे २०.३४ सेकंदात पूर्ण केले.

दरम्यान,१७ वषार्खालील गटात मुलांच्या दोनशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीत अक्षय गोवर्धन याचे रौप्यपदक थोडक्यात हुकले. त्याने हे अंतर २२.१३ सेकंदात पार केले. आंध्रप्रदेशचा श्रीनिवास षणमुगम (२१.९२ सेकंद) व दिल्लीचा अंशुलकुमार (२१.९३ सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई केली.

3 Comments

Click here to post a comment