२०१९ ला सोनिया किंव्हा प्रियांका गांधीही जिंकणार नाहीत; कॉंग्रेस नेत्याची भविष्यवाणी

dinesh pratap sinh says congress will lose raebareli lok sabha seat

टीम महाराष्ट्र देशा: २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांत रायबरेली मतदारसंघातून सोनिया गांधी किंव्हा प्रियांका गांधी जरी लढल्या तरी जिंकणार नसल्याची भविष्यवाणी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते दिनेश प्रताप सिंह यांनी वर्तवली आहे. सिंह यांनी आज भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला. प्रवेशाच्या आधी त्यांनी कॉंग्रेस नेत्यांवर निशाना साधला

कॉंग्रेसमध्ये आपली घुसमट होत असल्याने आपण विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला मात्र प्रियंका गांधी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आपण राजीनामा दिल्याबाबत प्रियंका गांधी यांना फोन केला होता मात्र कॉंग्रेस-सपा आघाडी झाल्यासच राजीनामा स्वीकारणार असल्याच त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रियंका गांधी यांनी आपली सगळी स्वप्ने धुळीस मिळवल्याचा आरोप करत दिनेश प्रताप सिंह यांनी भाजपात प्रवेश केला.

दरम्यान सिंह याच्याकडून करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसकडून देण्यात आली आहे. तसेच ते केवळ आपल्या स्वार्थासाठी सर्व करत असल्याची टीकाही कॉन्ग्रेसने केली आहे.